मंगळवार, 2 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 18 एप्रिल 2020 (13:10 IST)

पाक क्रिकेट बोर्डाला मोठा आर्थिक फटका

Great
दहशतवादाच्या मुद्दयावरून 2008 पासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतीही मालिका झाली नाही. ज्यामुळे पाक क्रिकेट बोर्डाचे अंदाजे 90 लाख अमेरिकन डॉलर्सचे नुकसान झाले आहे. तर याचा फटका भारताला फारसा बसलेला नाही.

बीसीसीआय आणि पाक क्रिकेट बोर्डामध्ये 5 वर्षांचा करार झाला होता. जो करार एप्रिल महिन्यात संपणार आहे. यानुसार भारत-पाक घरच्या मैदानावर दोन मालिका खेळणार होते. या मालिकेसाठी पाक क्रिकेट बोर्डाने मोठी तयारी केली होती, ज्यासाठी कोट्यवधी डॉलर्सचे करारही करण्यात आले होते. मात्र बीसीसीआयने यातून माघार घेतल्मयमुळे पाक क्रिकेट बोर्डाला मोठा फटका बसल्याची माहिती, पीटीआय वृत्तसंस्थेला दिली.