मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: वुहान , गुरूवार, 26 मार्च 2020 (18:30 IST)

पर्यटकांसाठी ‘ग्रेट वॉल ऑफ चायना’ सुरू

जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक देश लॉकडाऊन करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक हॉटेल्स, उद्याने, ग्रंथालये आणि दुकानांना टाळं लावण्यात आलं आहे. परंतु ज्या ठिकाणाहून हा व्हायरस पसरायला सुरुवात झाली. त्या चीनमध्ये मात्र परिस्थिती हळूहळू पूर्ववत व्हायला सुरुवात झाली आहे. चीनच्या बीजिंगमधील रेस्टॉरंट, कॅफे आणि प्राणिसंग्रहालये मागील आठवड्यात सुरू करण्यात आली. तर संपूर्ण जगाचे आकर्षण असलेली ‘ग्रेट वॉल ऑफ चायना’देखील पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहे.

बीजिंगची राजधानी वुहानमधून कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली. त्यानंतर जानेवारी महिन्यात संपूर्ण चीन लॉकडाऊन करण्यात आले. आता तब्बल तीन महिन्यानंतर येथील दैनंदिन जीवन सुरळीत होत आहे. दरम्यान, चीनमधील काही सिनेमागृहेदेखील सुरू करण्यात आलेली आहेत, परंतु खबरदारी म्हणून याठिकाणी नागरिकांनी न फिरकणेच पसंत केले आहे.