1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: शनिवार, 3 ऑगस्ट 2019 (09:38 IST)

भाजपमध्ये सुरू असलेली महाभरती बंद नाही : मुख्यमंत्री

Devendra Fadnavis and Aditya Thackeray's journey begins
भाजपमध्ये सुरू असलेली महाभरती बंद केलेली नाही. चांगले लोक येत असतील तर जरूर पक्षात घेऊ, असा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्धा येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. उर्वरित महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची महाभरती झाल्यानंतर विदर्भातून यात्रा सुरू होताच ती बंद झाल्याची घोषणा का करावी लागली, असा प्रश्न विचारल्यावर मुख्यमंत्री म्हणाले, इच्छा असलेल्या सगळय़ांनाच पक्षात घेऊ शकत नाही.
 
जे लोकप्रिय आहेत, ज्यांना जनाधार आहे अशांसाठी अजूनही भरती सुरू आहे. या भरतीविषयी भाजपमध्ये कुरबुर सुरू असल्याच्या शंकेबाबत मुख्यमंत्री म्हणाले, महाभरती वगैरे असा काही प्रकार नाही. मुळात आमच्या पक्षाच्या तुलनेत इतर पक्षांतील केवळ अर्धा टक्के नेत्यांनाच भाजपमध्ये प्रवेश दिला आहे असे सांगितले.