शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: शनिवार, 3 ऑगस्ट 2019 (09:29 IST)

मुख्यमंत्री यांच्या महाजनादेश यात्रेत यांनी दिल्या घोषणा

वर्जिधा येथे आयटकच्यावतीने जेलभरो आंदोलन केले गेले आहे. भाजपची महाजनादेश यात्रा आज वर्धा जिल्ह्यात होती,  यावेळी अंगणवाडी, शालेय पोषण आहार व कंत्राटदारी कर्मचाऱ्यांच्यावतीने मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांसंदर्भात निवेदन दिले आहे. मात्र यावेळी मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून केला आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी करत जेलभरो आंदोलन केले आहे. 
 
यावेळी काही महिला आंदोलकांना ताब्यात देखील घेतले आहे. केंद्र् सरकारतर्फे गट प्रवर्तकांना देण्यात येणारी रक्कम अजूनही मिळालेली नसून, त्याचसोबत शालेय पोषण आहार कर्मचारी आणि कंत्राटी यांच्या विविध मागण्यांसदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला आहे.