शिवस्वराज्य यात्रा सुरु होणार, नेमकी ही कोण करणार ?
शिवसेनाचे नेते अदित्य ठाकरे यांच्या जनआशिर्वाद यात्रे नंतर भारतीय जनता जनता पक्षाची महाजनादेश यात्रा सुरु होणार आहे आता, या दोन्ही यात्रांना सामना करण्यासाठी विधानसभेच्या तयारी करिता राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा सुरु होत आहे. शिवसेनेचे युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या करीता जनआशिर्वाद यात्रा सुरु झाली. या यात्रेत युवा अदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या दुष्काळी भागात लोकांशी संपर्क साधुन शिवसेना शेतकऱ्यांच्या बरोबर असल्याचे सांगीतले आणि इतर अनेक गोष्टींवर त्यांनी प्रकाश टाकला आहे. आता भारतीय जनता पक्षाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला अमरावती पासून सुरुवात होत आहे. राष्ट्रवादीच्या या यात्रेला सहा पुणे जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळापासून सुरुवात होऊन रायगड येथे या यात्रेचा समारोप होणार आहे. या यात्रेचे स्टार कॅंपेनर म्हणून राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे हे असणार आहेत. तर खासदार उद्यनराजे भोसलेही या य़ात्रेत सहभागी असणार आहेत. या यात्रेची सर्व धुरा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसवर असणार आहे. ही यात्रा दररोज तीन विधानसभा मतदार संघामध्ये जाणार आहेत.