मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 एप्रिल 2020 (21:50 IST)

भारत परत धाडणार चीनच्या रॅपिड टेस्ट किट

चीनकडून आयात करण्यात आलेल्या रॅपिड टेस्ट किट 'डुप्लीकेट' निघाल्यानं त्याचा वापर थांबवण्याचे आदेश आयएमसीआरनं राज्यांना दिले होते. आता भारत सरकारनं चुकीचा निकाल देणाऱ्या 'अँन्टीबॉडी टेस्ट किट' त्यांच्या देशांना परत पाठवण्याचा निर्णय घेतलाय.
 
संकाटाच्या काळात चीनकडून आयात करण्यात आलेल्या पीपीई आणि नंतर रॅपिड टेस्ट किट या दोन्ही वस्तू 'डुप्लीकेट' निघाल्याने भारताने त्यावर कठोर भूमिका घेतलीय. यासंबंधी बोलताना केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी या टेस्ट किट ज्या देशातून आयात करण्यात आल्या त्यांनाच परत पाठवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.
 
करोना चाचणीसाठी वापरल्या जाणाऱ्या 'रॅपिड टेस्ट किट' चुकीचा निकाल देत असल्याचं समोर आल्यानंतर अनेक राज्यांनी या टेस्ट किटचा वापर तत्काळ बंद केला होता. नंतर Indian Council of Medical Research ने देखील या टेस्ट किटचा वापर थांबवण्याचे आदेश इतर राज्यांना दिले. आता या टेस्ट किट चीनला परत पाठवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.