शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 23 एप्रिल 2020 (21:54 IST)

डीआरडीओची मोठी कामगिरी, तयार केली लॅब

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी  मोबाइल व्हायरॉलॉजी रिसर्च अँड डायग्नोस्टिक प्रयोगशाळेच व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन केले. या लॅबमुळे Covid-19 शी संबंधित संशोधन आणि चाचण्या वेगाने करणे शक्य होणार आहे. संरक्षण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली. संरक्षण संशोधन विकास संस्था डीआरडीओ, हैदराबादस्थित एक हॉस्पिटल आणि खासगी उद्योगाने मिळून ही MVRDL लॅब विकसित केली आहे.
 
यावेळी डीआरडीओने बायोसेफ्टी लेव्हल २ आणि ३ ही प्रयोगशाळा विक्रमी १५ दिवसांमध्ये उभी केल्याबद्दल राजनाथ सिंह यांनी अभिनंदन केल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. अशी प्रयोगशाळा उभी करण्यासाठी सर्वसाधारणपणे सहा महिने लागतात.
 
“करोना व्हायरसच्या चाचणीचे दिवसाला १ हजार नमुने तपासण्याची या लॅबची क्षमता आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि इंडियन काऊंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या मार्गदर्शक तत्वानुसार ही लॅब उभी करण्यात आली आहे” असे मंत्रालयाकडून सांगण्यात आले.