रविवार, 1 ऑक्टोबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: हैदराबाद , शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020 (14:41 IST)

हैदराबाद संघाच्या कर्णधारपदी डेव्हिड वॉर्नरची घोषणा

आयपीएल 2020 स्पर्धेला महिन्याभराचा कालावधी शिल्लक आहे. केवळ भारतीय प्रेक्षकच नव्हे, तर जगभरातील क्रिकेटरसिक आयपीएलची वाट पाहात आहेत. या स्पर्धेसाठी सारेच खेळाडू कसून सराव करताना दिसत आहेत. विविध संघांनी आपले प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक आणि इतर व्यक्तींची निवड केली आहे. काही संघ अजूनही काही निवडींबाबत साशंक आहेत. पण या दरम्यान, सनराझर्स हैदराबाद या संघाने आपल्या यंदाच्या हंगामासाठी डेव्हिड वॉर्नरची कर्णधारपदी घोषणा केली आहे. 
 
सनरायझर्स हैदराबाद संघाकडून ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याला संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. सनरायझर्स संघाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही घोषणा केली. त्याचसोबत त्यांनी वॉर्नरचा एक खास संदेशही ट्विट केला आहे. हैदराबाद संघाच्या सगळ्या चाहत्यांना माझा नमस्कार. माझी हैदराबाद संघाचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. मला मिळालेल्या या संधीसाठी मी संघ व्यवस्थापनाचा आभारी आहे. 
 
केन विल्यमसन आणि भुवनेश्र्वर कुमार यांनी संघाचे चांगले नेतृत्व केले. आयपीएल जिंकण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू, असा संदेश त्याने व्हिडिओद्वारे दिला.