शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 18 डिसेंबर 2019 (14:29 IST)

आयपीएलच्या लिलावासाठी गतविजेत्या मुंबईकडे सर्वात कमी पैसे

पुढील वर्षी होणार्‍या आयपीएलसाठी 19 तारखेला कोलकाता येथे लिलाव होणार आहे. यासाठी बीसीसीआने 332 खेळाडूंना शॉटलिस्ट केले असून तपैकी 73 खेळाडूंना पुढील वर्षी खेळण्याची संधी मिळणार आहे. उपलब्ध असलेल्या 332 खेळाडूंवर 8 संघ मालक बोली लावतील. या लिलावाआधी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्यावर्षी चेन्नई सुपरकिंग्जचा पराभव करून आयपीएलचे विजेतेपद मिळवणार्‍या मुंबई इंडियन्स संघाकडे सर्वात कमी पैसा शिल्लक राहिला आहे.
 
मुंबई संघाने सर्वाधिक चारवेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे. तर याउलट आतापर्यंत स्पर्धेचे एकदाही विजेतेपद न मिळवणार्‍या किंग्ज इलेव्हन पंजाबकडे लिलावात बोली लावण्यासाठी सर्वाधिक पैसा आहे.
 
पंजाब संघ नऊ खेळाडूंवर बोली लावू शकतो. या नऊपैकी चार खेळाडू परदेशी असू शकतील. अभिनेत्री प्रीती झिंटा ही पंजाब संघाची सहमालकीण आहे. पंजाब संघाकडे यंदाच्या लिलावात सर्वाधिक म्हणजे 42.70 कोटी रुपये आहेत. ते या लिलावात नऊ खेळाडू विकत घेऊ शकतात.
 
खेळाडूंना रिटेन आणि रिलीज केल्यानंतर सर्वाधिक पैसा पंजाब संघाकडे शिल्लक राहिला आहे. तर मुंबई संघाला सात खेळाडूंची गरज आहे. यात दोन परदेशी खेळाडूंना विकत घेता येऊ शकते. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या मुंबई संघाकडे 13.05 कोटी रुपये आहेत.
 
या रमकेत मुंबईला अधिक खेळाडू विकत घ्यावे लागणार आहेत. अर्थात गतविजेत्या मुंबई संघात सध्या अनेक दर्जेदार खेळाडू आहेत, जे प्रतिस्पर्धी संघावर मात करू शकतील. पंजाबपाठोपाठ सुपरस्टारशाहरुख खानच्या मालकीच्या कोलकाता नाइट राडर्स संघाकडे सर्वाधिक पैसे शिल्लक आहेत. त्यांच्याकडे 35.65 कोटी इतकी रक्कम शिल्लक आहे. या संघाला 11 खेळाडूंना विकत घ्यायचे आहे. त्यात चार परदेशी खेळाडू असू शकतील.
 
आपीएलधील संघ आणि त्यांच्याकडील शिल्लक रक्कम  
1) पंजाब - 42.70 कोटी
2) कोलकाता - 35.65 कोटी
3) राजस्थान - 28.90 कोटी
4) बंगळुरू -27.90 कोटी
5) दिल्ली - 27.85 कोटी
6) हैदराबाद - 17.00 कोटी
7) चेन्नई - 14.60 कोटी
8) मुंबई - 13.05 कोटी