शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 3 मार्च 2020 (10:45 IST)

करोना अपडेटस् : भारतात पाच रुग्ण

भारतात करोना व्हायरसचा (COVID-19) संसर्ग झालेले दोन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, करोना व्हायरसचा (Corona virus) पहिला रुग्ण राजधानी दिल्लीत तर दुसरा रुग्ण तेलंगणामध्ये आढळलाय. हे दोन्ही जण परदेशातून भारतात परतल्याचं समजतंय. दिल्लीमध्ये आढळलेला रुग्ण हा इटलीहून भारतात परतलाय. तर दुसरा व्यक्ती दुबईतून भारतात आलाय. उल्लेखनीय म्हणजे यापूर्वी केरळमध्ये करोना व्हायरसचे तीन रुग्ण आढळले होते. त्यामुळे आता भारतात करोना पीडितांची एकूण संख्या ५ वर गेलीय.
 
त्याचबरोबर तिसरा संशयीत रुग्ण राजस्थानमध्ये आढळून आल्याचे तिथल्या अधिकृत आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. राजस्थानमध्ये एका इटलीच्या पर्यटकाची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या रुग्णांच्या रक्ताचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत (एनआयव्ही) तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या रुग्णाची प्राथमिक चाचणी निगेटिव्ह आली होती त्यानंतर पुन्हा चाचणी केल्यानंतर ती पॉझिटिव्ह आली आहे.