तिवरे धरण दुर्घटना: मदत कार्य सुरु, चौकशी होणार

chiplun dam
रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण तालुक्यातलं तिवरे धरण अतिवृष्टीमुळे फुटलं आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली आहे. या दुर्घटनेत 24 जण बेपत्ता झाले असून दुर्घटनेतील 7 जणांचे मृतदेह हाती लागल्याची माहिती मिळाली आहे.

तिवरे धरणाला तडे गेल्याबाबत नागरिकांनी तक्रार केली होती अशी कबुली जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. लीकेज असताना स्थानिकांना तक्रार दिली गेली होती. आता या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करणार असे गिरीश महाजन म्हणाले.

ताज्या माहितीनुसार घटनेतील 7 जणांचा मृतदेह हाती लागला आहे. नदीतील पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून काठच्या गावकऱ्यांनाही धोक्याचा इशारा दिला गेला आहे.

धरण 2012 साली बांधून पूर्ण झाले. 2.452 दशलक्ष घनमीटर इतकी त्याची पाणी साठवणुकीची क्षमता आहे. तिवरे धरणाला दुरूस्तीची गरज असल्याचं आधीच लक्षात आलं होतं. या धरणाची दुरूस्ती करण्याची गरज असल्याचे ग्रामस्थांनी वारंवार निदर्शनास आणून दिले होते. खासदार विनायक राऊत यांनी पाटबंधारे खात्याला धरण दुरूस्तीच्या सूचनाही केल्या. त्या सूचनांमुळे पाटबंधारे खात्याकडून दोन डंपर माती टाकून दुरूस्ती करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र चार दिवसांच्या पावसाने ही डागडुजीही कमकुवत ठरवली. आता या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत.

धरण फुटल्यानं ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे या गावांमध्ये पाणी शिरलं. पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्यानं 24 जण वाहून गेले. धरण परिसरातील 13 घरंदेखील प्रवाहात वाहून गेली. यामुळे मोठी वित्तहानी झाली. सध्या एनडीआरएफच्या जवानांकडून बचावकार्य सुरू असून आतापर्यंत 7 जणांचे मृतदेह शोधण्यात यश आलं आहे. या दुर्घटनेला 12 तास उलटल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

'या' राज्यांना कर्नाटकात नो एन्ट्री

'या' राज्यांना कर्नाटकात नो एन्ट्री
करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यांमधून येणाऱ्या प्रवाशांमुळे संसर्ग वाढण्याची भीती ...

भारत-ऑस्ट्रेलियाचे कसोटी मालिकाचे वेळापत्रक जाहीर

भारत-ऑस्ट्रेलियाचे कसोटी मालिकाचे वेळापत्रक जाहीर
आयसीसीने भारत-ऑस्ट्रेलियाचे कसोटी मालिकाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ३ डिसेंबरला ...

अशोक चव्हाणांनी रुग्णालयातूनच फेसबूकवर विडीओ केला शेयर

अशोक चव्हाणांनी रुग्णालयातूनच फेसबूकवर विडीओ केला शेयर
काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांची कोरोना व्हायरसची लागण झाली. मुंबईतल्या एका ...

TikTok ला टक्कर देणार भारतीय Mitron अ‍ॅप, 50 लाखांहून अधिक ...

TikTok ला टक्कर देणार भारतीय Mitron अ‍ॅप, 50 लाखांहून अधिक डाऊनलोड
टिकटॉकवर वाद सुरूच असतात. यूट्यूब विरुद्ध टिकटॉक हा वाद तर शिगेला पोहोचला असून अनेकांनी ...

कोरोनाला हरविण्यासाठी पतंजलीने सुरू केली वैद्यकीय चाचणी

कोरोनाला हरविण्यासाठी पतंजलीने सुरू केली वैद्यकीय चाचणी
गुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीने कोविड १९ च्या उपचारासाठी वैद्यकीय चाचणी सुरू केल्याची ...