बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

उमेदवाराने दिला स्टॅप पेपरवर जाहीरनामा, लोकसभा निवडणुकीतील पहिलीच घटना

कायदेशीर गोष्ट करायची असेल तर आपण स्टॅप पेपरवर लिहून गोष्टी पूर्ण करतो. तर आपण अनेकदा एखाद्याला गोष्ट पटवून देताना म्हणतो की अरे काय स्टॅप पेपरवर लिहून देऊ का? आता या स्टॅप पेपरचा उपयोग केला आहे एका उमेदवाराने त्याने चक्क त्याचा जाहीरनामा स्टॅप पेपरवर दिला आहे. निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असणाऱ्या या उमेदवाराने चक्क 100 रुपयांच्या स्टॅप पेपरवर, आपण निवडून आलो तर काय करु, याचा जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. एखाद्या उमेदवारांनी अशाप्रकारे नोटरी करुन जाहीरनामा प्रसिद्ध करण्याची ही या लोकसभा निवडणुकीतील पहिलीच घटना आहे.
 
रत्नागिरी व सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून समाजवादी फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे उमेदवार संजय गांगनाईक उमेदवार आहेत. गंगानाईक यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु असून, राष्ट्रीय पक्ष नेहमीच वचनामा किंवा जाहीरनामे प्रसिद्ध करतात. मात्र गांगनाईक यांनी जाहीर केलेला वचननामा काहीसा हटके झाला आहे, पेशाने वकील असलेल्या संजय गांगनाईक यांनी चक्क 100 रुपयांच्या शपथपत्रावर म्हणजे बॉण्ड पेपरवर वचननामा प्रसिद्ध केलाय. वचननाम्यात गांगनाईक यांनी सांगितले की दिवस-रात्र जनतेच्या प्रश्नांसाठी काम करेन,स्वार्थांसाठी विशेष सवलत उपभोगणार नाही,संसदीय हिशेब वेळच्या वेळी जनतेला देईन,प्रत्येक महिन्यात एकदा तरी मतदार संघातील एका तालुक्याला भेट देईल,केंद्रात येईल त्या सत्ताधारी पक्षाला विनाअट पाठिंबा देईनजनतेनी आणलेली विधायक कामे पूर्ण करेन हे सर्व उल्लेख केला आहे. आता कायदेशीर जाहीरनाम प्रसिद्ध केला याचा कितपत त्याना फायदा होतो हे निवडणूकच ठरवेल.