रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 23 जानेवारी 2019 (16:24 IST)

रत्नागिरीत 'ठाकरे' चित्रपट तीन दिवस मोफत

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' हा चित्रपट येत्या 25 जानेवारीला प्रदर्शित होत आहे. रत्नागिरीतील लोकांना हा चित्रपट तीन दिवस मोफत पाहण्याची संधी मिळणार आहे. 'ठाकरे' हा चित्रपट 25 ते 27 असा तीन दिवस रत्नागिरीतील लोकांना विनामूल्य पाहता येणार आहे. 
 
शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या रत्नागिरीमध्ये 'ठाकरे' चित्रपट तीन दिवस मोफत दाखविण्यात येणार आहे. शिवसैनिकांना राधाकृष्ण सिटी प्राईड येथे सहा वेळा हा चित्रपट पाहायला मिळणार आहे. खासदार विनायक राऊत, आमदार उदय सामंत यांच्या सहकार्याने चित्रपटाचे शो होणार आहेत. तीन दिवस दररोज दोन शो असून दुपारी 12 ते 3 व रात्री 9 ते 12 या वेळेत ते होतील. 27 जानेवारीला शालेय मुले, कॉलेज तरुणांसाठी शो होणार आहे. तिकिटे चित्रपटगृहात उपलब्ध असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य आहे.