देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कारागृहाबाहेर
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे याला तात्पुरत्या स्वरूपात कारागृहाबाहेर येण्याची परवानगी देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आरोपी जयराम चाटे याच्या भावाचा 2 मार्च रोजी मृत्यू झाला होता. त्याच्या बाराव्या विधीसाठी उपस्थित राहण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली असून न्यायालयाने मानवतावादी दृष्टिकोनातून हा निर्णय घेतला.
न्यायालयाने सकाळी 9 ते संध्याकाळी 4 या मर्यादित वेळेत बाहेर येण्याची परवानगी दिली. आरोपीला कडक पोलिस बंदोबस्तात गावात नेण्यात आले आणि विधी संपल्यानंतर पुन्हा कारागृहात परत नेले जाणार आहे. 9 डिसेंबर 2024 रोजी सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. तसेच या हत्या प्रकरणातील वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी मानला जातो आणि इतर आरोपीही सध्या तुरुंगात आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरण बीड जिल्ह्यात आधीच चर्चेचा विषय ठरले आहे. आरोपीला काही तासांसाठी तुरुंगातून सोडण्यात आल्यामुळे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. पोलिसांना कडक सुरक्षेत अंत्यसंस्कारासाठी आरोपीला एस्कॉर्ट करण्याचे आणि निर्धारित वेळेनंतर तुरुंगात परत पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहे. थोडक्यात देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे कायमस्वरूपी सुटलेला नाही, तर भावाच्या धार्मिक विधीसाठी काही तासांसाठी न्यायालयाने तात्पुरती परवानगी दिली आहे.
Edited By- Dhanashri Naik