मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 18 जून 2019 (09:44 IST)

हेलिकॉप्टर पोहोचले रस्त्याने भोसला सैनिकी शाळेत

संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेल्या भोसला सैनिकी शाळेला राज्य शासनाने देणगी स्वरूपात निळ्या रंगाचे जुने हेलिकॉप्टर (डॉफिन एएस-३६५ एन-३ व्ही टी एमजीके) हे देणगी स्वरुपात दिले आहे. विद्यार्थी वर्गाला माहिती व्हावी व त्यातून त्यांनी प्रेरणा घ्यावी असा उद्देश यामागील आहे. हे मुंबईहून एका कंटेनरवरून शहरात आणले गेले आहे. रस्त्याच्या मार्गे हे हेलिकॉप्टर कंटेनर वर आणले गेले होते त्यामुळे पूर्ण शहरात हे चर्चेचा विषय ठरले आहे. तर सैनिकी शाळा असल्यामुळे येथे प्रदर्शित करण्यासाठी हेलिकॉप्टर देण्यात आल्याची माहिती सर कार्यवाह डॉ. दिलीप बेलगावकर यांनी स्पष्ट केले आहे.
 
सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन संस्थेच्या भोसला सैनिकी शाळेला राज्य शासनाकडून जुने हेलिकॉप्टर आवारात प्रदर्शित करण्यासाठी दिले आहे. हेलिकॉप्टर शाळेच्या आवारात एका कंटेनरवरून दाखल केले आहे.शहरातील पोलीस आयुक्तालय हद्दीत विल्होळी येथे कंटेनर पोहोचताच तेथून पुढे थेट भोसला सैनिकी शाळेच्या प्रवेशद्वारापर्यंत शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून बंदोबस्त पोहोचवले गेले आहेत. या हेलिकॉप्टरचे पंखे काढून घेण्यात आले होते.निळ्या रंगाचे हेलिकॉप्टर भोसला सैनिकी शाळेत पोहोचले आहे.
 
विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षणाचे या शाळेत शिक्षण दिले जाते, त्याकरीता हेलिकॉप्टरचे प्रात्यक्षिक अर्थात ‘डेमो’ स्वरूपात प्रारंगणात असावा, याकरिता भोसलाचे डॉ. दिलीप बेलगावकर, कार्यवाह हेमंत देशपांडे यांनी शासनाकडे याबाबत मागणी केली होती.त्यामुळे विमान संचलनालय जुहू विमानतळ येथून हेलिकॉप्टरची वाहतूक मुंबई ते नाशिक एका कंटेनरवरून केली गेली आहे.डॉल्फिन एएस ३६५ एन ३ व्हीटी एमजीके असे या हेलीकॉप्टरचे नाव असून, याबाबत ७ सप्टेंबर २०१७  रोजी अधिकृत निर्णय आल्यानंतर  प्रस्ताव पाठवण्यात आले होते. त्यानुसार प्रत्यक्ष हेलीकॉप्टर संस्थेला मिळाले आहे.
 
मात्र हे हेलीकॉप्टर संस्थेला दिल्यानंतर महत्वाच्या अश्या अटी ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रमुख अट अशी की हे चांगल्या स्थितीत असलेले हेलिकॉप्टर कोणत्याही प्रकारे उड्डाणासाठी अजिबात वापरता येणार नाही. तर या हेलिकॉप्टरची उड्डाण फ्लाईट नोंदणी विमान चलन संचालनालयाकडेच रहाणार आहे. सोबतच कुठलाही भाग विक्री करता येणार नाही.तर फक्त शिक्षणासाठी व विध्यार्थी वर्गाला माहिती देणे हाच एकमेव उद्देश असणार आहे.