मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 17 जून 2019 (16:44 IST)

फेसबुक लाईव्ह करताना अपघात, 2 भावांचा मृत्यू

नागपूरच्या काटोल येथे चालत्या गाडीत फेसबुक लाईव्ह करताना झालेल्या अपघात 2 भावांचा मृत्यू झाला, तर अन्य 7 जण जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे फेसबूक लाईव्ह करणाऱ्याच्या मृत्यूनंतरही हे लाईव्ह काहीवेळ सुरुच होते. या घटनेत पुंकेश पाटील कार चालवत होता, तर त्याचा भाऊ संकेत पाटील मोबाईलवरून फेसबूक लाईव्ह करत होता. चालत्या कारमध्ये फेसबूक लाईव्ह करत असतानाच दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक करुन पुढे जाण्याच्या नादात हा अपघात झाला. या अपघातात पुंकेश पाटील आणि त्याचा भाऊ संकेतचा मृत्यू झाला, तर 7 जण जखमी झाले. फेसबुक लाईव्ह करताना अपघाताच्या नागपुरात अनेक घटना घडल्या आहेत. अशाप्रकारच्या घटनांमध्ये आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे.