बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

काय लीची खाल्ल्यामुळे येतोय चमकी ताप? 100 हून अधिक मुलांनी गमावले प्राण, जाणून घ्या लक्षण

बिहारच्या काही भागात अक्यूट इंसेफेलाइटिस सिंड्रोम (AES) अर्थात चमकी तापामुळे आतापर्यंत 10 वर्षाच्या वयाहून कमी जवळपास 100 मुलांचा मृत्यू झाला आहे. एक्सपर्टप्रमाणे लीची खाल्ल्यामुळे मृत्यू झाला आहे. मुलांनी रिकाम्या पोटी लिचीचे सेवन केल्यामुळे ते या सिंड्रोमच्या पकडमध्ये आले. 1 ते 15 वर्ष या वयाचे मुले याचा शिकार होत असल्याचे कळून आले आहे. अनेक लीची खाणे आणि उन्हात खेळल्यामुळे बळी जात असल्याचे कळून येत आहे.
 
काय खरंच लीची असू शकते प्राणघातक?
 
एक्सपर्टप्रमाणे रिकाम्या पोटी लीची खाल्ल्याने मुलांच्या मेंदूत तापाचा धोका वाढत आहे. सोबतच त्यांनी सकाळी-सकाळी लीची खाल्ली असावी. बिहारच्या मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी देखील जाहीर केलेल्या एका सूचनेत मुलांना रिकाम्या पोटी लीची खाऊ नये असे सांगण्यात आले आहे. तसेच मुलांना कच्ची किंवा अर्ध्या पकलेल्या लीची खाण्यास मनाही करण्यात आली आहे.
 
रिकाम्या पोटी लीची प्राणघातक?
लीचीमध्ये 'हायपोग्लायसिन ए' आणि 'मेथिलीन सायक्लोप्रोपाइल ग्लायसीन' नावाचे दोन तत्त्व आढळतात आणि रिकाम्या पोटी लीची खाल्ल्याने ब्लड शुगर पातळी कमी होते ज्यामुळे हळू-हळू तब्येत बिघडू लागते आणि नंतर व्यक्तीचा मृत्यू होतो. तसं तर बिहारमध्ये लहान वयाचे मुलं या तापाने बळी पडले.
 
लीची खाल्ल्याने दोन आजारांचा धोका
एक्सपर्टप्रमाणे लीची खाल्ल्याने दोन प्रकारेच आजार होत आहे, ज्यात एक्यूट एन्सेफलाइटिस सिंड्रोम अर्थात चमकी ताप आणि हायपोग्लाइसीमिया सामील आहे. चमकी तापात आजाराला मेंदूमध्ये सूज येते आणि हायपोग्लाइसीमिया याच्यात शरीरात फॅटी अॅसिड चयापचय वाढविण्यास व्यत्यय निर्माण करतं. या कारणामुळे ब्लड शुगर पातळी कमी होऊ लागते आणि मेंदूसंबंधी समस्या देखील उद्भवू लागतात.
 
एक्यूट इंसेफेलाइटिस सिंड्रोम (एईएस) चे कारण
-सर्दी
-व्हायरल इन्फेक्शन
-बॅक्टेरियल इन्फेक्शन
-केमिकल
-ऑटोइम्यून रिऍक्शन्स
 
लक्षण दिसल्यावर लगेच उपचार आवश्यक
आरोग्य विभागाने या आजारावर गाइडलाइन जाहीर केली आहे. यानुसार रात्री रिकाम्या पोटी झोपणार्‍या मुलांना आजार होण्याची शक्यता अधिक असल्याचे सांगितले गेले आहे. लक्षण दिसल्याक्षणी दोन तासाच्या आत मुलांना रुग्णालयात घेऊन जाणे आवश्यक आहे कारण वेळेवर उपचार सुरू झाला नाही तर प्राणघातक ठरू शकतं.
 
लक्षण
-सुरवात उच्च ता
-शरीर लचकणे
-नर्व संबंधी कार्यात अडथळे येणं
-मानसिक विचलन जाणवणे
-स्नायू आणि हाडांमध्ये वेदना
-कमजोरी, थकवा आणि बेशुद्धी
-ऐकण्यात आणि बोलण्यात समस्या
-चक्कर येणं
-घबराहट जाणवणे
 
या प्रकारे करा बचाव
-मुलांना सकाळी रिकाम्या पोटी कच्ची लीची खायला देऊ नये. त्यांच्या आहाराची विशेष काळजी घ्या.
-मुलांमध्ये उपरोक्त लक्षण दिसत असल्या लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा.
-घरात आणि घराच्या बाहेर स्वच्छता ठेवा कारण या आजाराचं एक कारण बॅक्टेरियल इन्फेक्शन देखील आहे.
-मुलं आजारी असल्यात त्याला वेळेवर वॅक्सिनेशन करवा.
-डासांपासून बचावासाठी शरीरा झाकलं जाईल असे कपडे घाला.
-कोणासोबतही खाद्य पदार्थ, उष्टं जेवण, उष्टं ड्रिंक्स शेअर करू नका.
-मुलं पीत असलेलं पाणी स्वच्छ असावा हे सुनिश्चित करा.
-मुलांना थोड्या-थोड्या वेळात लिक्विड पदार्थ देत राहा.