शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

या वस्तू सेवन करत असाल तर सावध व्हा, आपलं मूड होऊ शकतो ऑफ

सगळे दिवस आनंदात जावे अशी प्रत्येकाची इच्छा असते परंतू अनेकदा नकळत मन दुखी होतं आणि यामागील कारण देखील कळत नाही. तर याचे कारण चुकीचे खाद्य पदार्थ सेवन करणे असे देखील असू शकतं. आज आम्ही आपल्याला अश्या 5 वस्तूंबद्दल सांगत आहोत ज्यांचे सेवन केल्याने मन उदास होऊन जातं.
 
1 अॅल्कोहल - आपण सेलिब्रेट करण्यासाठी अॅल्कोहलचे सेवन करत असाल पण खरं म्हणजे ही दुःखाची साथी आहे. याचे सेवन केल्याने आपल्या मज्जासंस्थेवर प्रभाव पडतो आणि त्याची गती हळू होते ज्यामुळे अनेकदा आनंदी वातावरणात देखील आपण दुखी होऊन जातो.
 
2 मीट - विशेष करून लाल मास किंवा पॅक्ड मास अत्यंत हानिकारक ठरतं. यात संतृप्त चरबीचे प्रमाण अधिक असल्यामुळे हे इंसुलिनचे लेवल परिवर्तित करतं आणि परिणामस्वरूप केवळ निराशाच नव्हे तर अनेक गंभीर आजार 
 
होण्याची शक्यता वाढते.
 
3 व्हाईट ब्रेड - व्हाईट ब्रेडमध्ये आढळणारे कार्बोहायड्रेटचे प्रमाण महिलांना दुखी करू शकतं. यामुळे थकवा देखील जाणवतो.
 
4 कॉफी - कॉफीमुळे थकवा नाहीसा होता आणि ऊर्जा मिळत नसली तरी यात आढळणार्‍या कॅफिनमुळे आपली झोप चाळी होऊ शकते. याने मानसिक थकवा येतो आणि शेवटी मन उदास होतं.
 
5 तांदूळ - तांदळाचे अती सेवन केल्याने निराश वाटू लागतं. यात रिफाइंड कार्बोहायड्रेट आढळतं ज्यामुळे हे हार्मोनल परिवर्तनासह शरीराच्या ग्लिसिक इंडेक्स प्रभावित करतं आणि मानसिक निराशा जाणवते.