रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

दुबईत बस अपघातात आठ भारतीयांसह 17 जणांचा मृत्यू

फोटो: ट्विटर

ओमानहून सुट्ट्यांहून परत असलेल्या प्रवाश्यांनी भरलेली एक बस शेख मोहम्मद बिन जायेद रोडवर दुर्घटनाग्रस्त झाली. या अपघातात 17 जणांचा मृत्यू झाला ज्यातून आठ भारतीयांचा समावेश आहे. पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. 
 
दुबई पोलिसांनी पृष्टी करत सांगितले की बसमध्ये 31 प्रवाशी होते. मेट्रो स्टेशनजवळ गाइडिंग बोर्डाला धडकल्यामुळे बसचा अपघात झाला. जखमी लोकांना राशिद हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
 
17 मृतक वेगवेगळ्या देशाचे आहेत. ज्यातून पाच गंभीर जखमी आहेत. भारताच्या वाणिज्य दूतावासानं खेद प्रकट करत आठ भारतीयांची मृत्यू झाल्याची पृष्टी केली आहे. वाणिज्य दूतावास काही मृतांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहे. तर इतरांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या बस अपघातात जखमी असलेल्या चार भारतीयांना उपचारानंतर घरी पाठवलं आहे. तर तिघांवर राशीद रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
 
दुबई पोलिसांनी मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे.