रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 20 मे 2019 (11:50 IST)

ब्राझीलच्या बेलेम शहरात झालेल्या गोळीबारात 11 जण ठार

उत्तरी पैरा स्टेटच्या नागरिक सुरक्षा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बेलेम शहराच्या एका बारमध्ये झालेल्या हल्ल्यात 11 लोकांचा मृत्यू झाला आहे. ही भयानक घटना शहराच्या मध्यभागी रविवारी रात्री घडली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृतांमध्ये 6 महिला आणि 5 पुरुष समावेश आहे.
 
स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, या गोळीबारामध्ये 7 बंदूकधारी असून, त्या सर्व हल्लेखोरांनी आपल्या तोंडावर काळ्या रंगाचे माक्स चढवले होते. त्यामुळे हल्लेखोरांची ओळख पटवणे अवघड जात असून, अद्याप स्थानिक पोलीस त्यांच्या शोधात आहे. 2017 च्या सर्वेनुसार ब्राझीलमध्ये 64 हल्ले झाले असून, त्यातील 70 हल्ले गोळीबार करून झाले आहे.