बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 9 मे 2019 (09:42 IST)

चीनच्या मुस्लिम बहुल शिनजियांग प्रांतामध्ये रोजा ठेवण्यावर प्रतिबंध

चीनच्या मुस्लिम बहुल शिनजियांग प्रांतामध्ये राहणाऱ्या मुस्लिमांच्या विरोधामध्ये सरकारने अनेक कडक प्रतिबंध घातले आहेत. रमजानची सुरुवात होताच या प्रांतातील सरकारी अधिकारी, विद्यार्थी आणि मुलांवर रोजा ठेवण्यावर प्रतिबंध लावण्यात आला आहे. चीन सरकारने बेवसाईटवर यासंदर्भात निर्देश जारी केले आहेत. याबाबत चीनने दावा केला आहे की, शिनजियांग ओइगर ऑटोनॉमस रीजनमध्ये सामाजिक स्थिरता कायम ठेवण्यासाठी असा निर्णय घ्यावा लागला आहे. 
 
दुसरीकडे मानवी हक्क आयोगाने या आठवड्यामध्ये जारी केलेल्या अहवालामध्ये असा दावा केला आहे की, संयुक्त राष्ट्र समितीने मुस्लिमांवर होत असलेल्या या अन्यायावर चिंता व्यक्त केली आहे. एचआरडब्‍लूच्या रिसर्चर माया बैंग यांनी सांगितले की, शिनजियांमध्ये राहणारे मुस्लिम कुटुंब आपल्याच घरामध्ये निगरानीखाली राहत आहेत. ऐवढेच नाही तर ते काय खातात आणि कधी झोपतात याची देखी सीपीसीला माहिती असते.