मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 8 मे 2019 (10:48 IST)

लाहोर: सूफी दर्ग्यात बाँबस्फोट, तीन ठार

फाइल फोटो
रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये पाकिस्तान बॉम्बस्फोटांनी हादरले. पाकिस्तानमधील लाहोर येथील सूफी पंथीयांच्या धार्मिक स्थळावर बाँबस्फोट घडवण्यात आल्याचे वृत्त आहे.
 
लाहोर येथील दाता दरबार दर्ग्याच्या बाहेर झालेल्या या स्फोटात तीन पोलिसांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. तसेच या हल्ल्यात 18 हून अधिक जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले आहे.
 
एक पोलीस व्हॅनही या बाँब हल्ल्याचं लक्ष्य बनली असल्याचं सांगण्यात येत आहे.