मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 1 एप्रिल 2019 (16:07 IST)

पाकिस्तानमध्ये बायकोच्या मनाविरुद्ध दुसरं लग्न केल्यामुळे भोगावी लागली शिक्षा

लाहोर- पाकिस्तानात एका व्यक्तीने आपल्या पहिल्या बायकोच्या मनाविरुद्ध गुपचुप दुसरं लग्न केल्यामुळे त्याला तीन महिन्याची कोठडीची शिक्षा सुनावली गेली आहे.
 
लाहोरच्या कँटॉनमेंट कोर्टाच्या मजिस्ट्रेट काशिफ अब्बास यांनी ‘पहिल्या पत्नीची अनिवार्य इच्छा’ विना दुसरं लग्नाच्या आरोपात व्यवसायी शोएब जाहिदला शिक्षा सुनावली आणि त्यावर 5,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे.
 
मजिस्ट्रेट यांनी 30 मार्चला दिलेल्या आपल्या निर्णयात म्हटले की तक्रार करणार्‍यांनी प्रस्तुत केलेल्या मौखिक आणि दस्तावेजी पुराव्यांनी सिद्ध होतं की त्यांच्या पतीने गुन्हा केला आहे. तक्रार दाखल करणारी राबिया युनूस ने यांनी कोर्टाला सांगितले की त्यांच्या नवर्‍याने गुपचुप पद्धतीने दुसरं लग्न केलं.