शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 9 मार्च 2019 (09:28 IST)

४० हून अधिक पाकिस्तानी नागरिकांना भारताचे नागरिकत्व

पुण्यात सुमारे ४० हून अधिक पाकिस्तानी नागरिकांना भारताचे नागरिकत्व बहाल करण्यात आले. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या उपस्थितीत नागरिकत्व देण्यात आले. पाकिस्तानातील हे अल्पसंख्यांक नागरिक अत्याचाराच्या भितीने भारतात पळून आले होते. 
 
पुण्याचे जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बऱ्याच वर्षांपासून पुण्यात राहणाऱ्या ४५ पाकिस्तानी नागरिकांना भारताचे नागरिकत्व बहाल करत त्याचे प्रमाणपत्र दिले. यामध्ये ४० वर्षापासून भारताचे नागरिकत्व मिळण्याच्या प्रतिक्षेत असलेल्यांचा समावेश होता. भारतीय नागरिकत्व कायद्यात सुधारणा केल्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांना नागरिकत्व देण्याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार मिळाला आहे.