मंगळवार, 1 एप्रिल 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 मार्च 2019 (11:09 IST)

काँग्रेसकडून लोकसभेसाठी १५ उमेदवारांची घोषणा

काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी १५ उमेदवारांची घोषणा केली आहे. काँग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्या यादीमध्ये संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शिद यांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशमधून काँग्रेसने पहिल्या यादीतून ११ उमेदवारांची नावे जाहीर केली, तर गुजरातमधून ४ जागांवर उमेदवार घोषित केले आहेत.
 
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अमेठीमधून लढणार आहेत. उत्तर प्रदेशातील अमेठी आणि रायबरेली काँग्रेस आणि पर्यायाने गांधी घराण्याचा बालेकिल्ला समजला जातो. या दोन जागांवर सपा आणि बसपा महाआघाडीने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शिद यांना फारुखाबादमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.