शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 2 मार्च 2019 (09:03 IST)

लोकसभा निवडणूक नियोजित वेळेतच होणार : निवडणूक आयोग

लोकसभा निवडणूक 2019 ही नियोजित वेळेतच होईल, असं म्हणत निवडणूक आयोगाने लोकसभेच्या तारखा पुढे ढकलण्याची शक्यता फेटाळली. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी याबाबतची माहिती दिली. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये निवडणूक आयोगाची बैठक झाली, या बैठकीनंतर अरोरा यांनी लोकसभा तारखांचा संभ्रम दूर केला. शिवाय उत्तर प्रदेशातील सर्व 80 लोकसभा मतदारसंघात VVPAT मशिनचा वापर केला जाईल असंही त्यांनी सांगितलं.
 
ईव्हीएम पूर्णत: सुरक्षित आहेत. सुप्रीम कोर्टानेही बॅलेट पेपरने निवडणूक होणार नाही हे स्पष्ट केलं आहे. 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत ईव्हीएमने एक निकाल लागला, मात्र त्याच्या चारच महिन्यांनी दिल्ली विधानसभेत दुसरा निकाल लागला, त्यामुळे ईव्हीएमवर संशय व्यक्त करणं चुकीचं आहे, असं अरोरा म्हणाले.