1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 29 जानेवारी 2019 (10:11 IST)

येत्या 28 फेब्रुवारीपर्यंतच बदल्या करा, निवडणूक आयोगाचे पत्र

all trasfer completes
28 फेब्रुवारीपर्यंत सर्व बदल्या पूर्ण करा, नंतर कुठल्याही बदल्या करता येणार नाही, असे पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील सर्व पोलिस अधिकारी आणि मुख्य सचिवांना पाठवले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने एकप्रकारे लोकसभा निवडणुकांच्या घोषणांबाबत संकेत दिले आहेत.
 
केंद्रीय निवडणूक आयोगने देशभरातील सर्व पोलिस अधिकारी आणि मुख्य सचिवांना पत्र लिहून कळवले आहे की, येत्या 28 फेब्रुवारी 2019 पर्यंत सर्व बदल्या पूर्ण कराव्यात. कारण, 28 फेब्रुवारीनंतर कुठल्याही बदल्या करता येणार नाहीत. तसेच, बदल्यांचे अहवाल निवडणूक आयोगने मागितले आहे.
 
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार, आता सरकारला फक्त एकच महिना काम करायला मिळणार आहे. लवकरच आचारसंहितेची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोग करणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.