अरोडा आपल्या देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त, त्यांच्या कारकिर्दीतली ती सर्वात मोठी जबाबदारी
आपल्या देशातील निवडणूक आयोग फार महत्वाचा आहे. त्यातील आता सुनील अरोडा यांची देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नियुक्ती केली असून, 2 डिसेंबरला मुख्य निवडणूक आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारणार आहे. अरोडा यांची मागीलवर्षी सप्टेंबर महिन्यात निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती होती. अरोडा हे राजस्थान कॅडरचे 1980 च्या बॅचचे IAS अधिकारी आहे. या आधी केंद्रीय माहिती, प्रसारण खात्यात सचिव होते. अरोडा यांनी अर्थ, वस्त्र, योजना आयोगात विविध पदावर काम केले असून, 1999-2002 या कार्यकाळात ते विमान वाहतूक मंत्रालयात संयुक्त सचिव होते. ते पाच वर्ष इंडियन एअरलाईन्सचे अध्यक्ष, मुख्य संचालक अश्या पदांवर होते. तीन वर्षात त्यांच्याकडे पूर्ण जबाबदारी होती. 2019 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार असून अरोडा यांच्या कारकिर्दीतली ती सर्वात मोठी जबाबदारी असणार आहेत. त्यासाठी निवडणुक आयोग कामाला लागले असून युद्धपातळीवर तयारी करण्यात येत आहे. टी. एन. शेषन यांनी त्यांच्या कारकिर्दीत मोठा ठसा उमटवला आहे तसा ठसा कोण उमटवणारा याकडे सर्वांचे लक्ष आहे.