गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018 (00:18 IST)

या देशांध्ये विचित्र गोष्टींवर टॅक्स!

जगातल्या प्रत्येकव्यक्तीला आपल्या उत्पन्नानुसार सरकारला टॅक्स द्यवा लागतो. जे गरजेचंही आहे आणि योग्यही. पण तेच जर तुम्हाला कुणी तुम्ही सिंगल आहात म्हणून टॅक्स द्या किंवा शरीरावर टॅटू काढायचा असेल टॅक्स द्या, तर तुमचं काय रिअ‍ॅक्शन असेल? हे काल्पनिक नाहीये. कारण अशाप्रकारच्या विचित्र गोष्टींवर काही देशांध्ये टॅक्स द्यावा लागतो. 
 
1) बॅचलर टॅक्स :
युनायटेड स्टेटच्या Missouri मध्ये 21 वर्षांच्या व्यक्तीपासून ते 50 वर्षांच्या व्यक्तीला सिंगल राहिल्यास 1 डॉलर टॅक्स द्यावा लागतो. हा टॅक्स पहिल्यांदा 1820 मध्ये लागू करण्यात आला होता. यासोबतच जर्मनी, इटली आणि साऊथ आफ्रिकासहीत अनेक देशांमध्ये बॅचलर टॅक्स वसूल केला जातो. म्हणजे इथे माणूस सुखाने सिंगलही राहू शकत नाही. 
 
2) पेट टॅक्स : 
2017 मध्ये पंजाब सरकारने पाळीव प्राण्यांवर टॅक्स वसूल करण्याची घोषणा केली. हे टॅक्स दोन प्रकारचे असतात. पहिला जर एखादी व्यक्ती त्याच्या घरी कुत्रा, मांजर, हरीण किंवा बकर्‍या पाळतो तर त्याला टॅक्स म्हणून वर्षाला 250 रुपये द्यावे लागतात. तेच गाय, म्हैस, हत्ती, घोडा आणि ऊंट यांसाठी 500 रुपये टॅक्स द्यावा लागतो. 
 
3) ब्लूबेरी टॅक्स : 
अमेरिकेतील Maine मध्ये ब्लूबेरीचं सर्वात जास्त उत्पादन होतं. तेच जर कुणी दुसरं याचं उत्पादन केलं किंवा याचं झाड विकत घेतात किंवा खरेदी करतात त्यांना प्रति पाउंड दीड पेनी टॅक्स भरावा लागतो.