1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 25 फेब्रुवारी 2019 (16:37 IST)

एक जागा सोडून मराठा क्रांती मोर्चा लोकसभेच्या ४७ जागा लढवणार

जशी निवडणूक जवळ येतेय तसी त्यातील रंगत वाढत आहे. आता या निवडणुकीत मराठा मोर्चातून समोर आलेली मराठी क्रांती मोर्चा आता राज्यातील एक जागा सोडून राज्यातील लोकसभेच्या उर्वरित ४७ जागा लढवणार आहे. महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी 47 जागांवर महाराष्ट्र क्रांती सेना लढणार आहे.  सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवार देणार नसल्याचे महाराष्ट्र क्रांती सेनेने घोषित केले आहे. उदयनराजेंविरोधात आम्हाला लढायचं नाहीय, अशी भूमिका महाराष्ट्र क्रांती सेनेने स्पष्ट केली आहे. 
 
याबदल महाराष्ट्र क्रांती सेनेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात माहिती दिली. तर ठाणे लोकसभा मतदारसंघातून रवींद्र साळुंखे यांना उमेदवारीचीही घोषणा केली. सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उदयनराजे भोसले हे विद्यमान खासदार असून. उदयनराजे भोसले हे साताऱ्यातून एकहाती जिंकतात. शिवाय, त्यांची लोकप्रियता अफाट आहे. सर्वसामान्य जनतेत मिसळणारा नेता आणि अडचणींच्या काळात धावून येणारा नेता म्हणूनही उदयनराजेंची ख्याती आहे. त्यामुळे आणि मराठा क्रांती मोर्चाला उदयनराजेंची त्यांचा पूर्ण पाठींबा दिला आहे. त्यामुळे आता लोकसभा निवडणूक अतितटीची होणार हे नक्की.