रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

'त्या' युवासैनिकांची आदित्य ठाकरे यांच्याकडून हकालपट्टी

पुलवामा हल्ल्यानंतर यवतमाळमध्ये काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या युवासैनिकांची आदित्य ठाकरे यांच्याकडून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे  यांनी ट्विटरद्वारे दिली. “राग दहशतवादाविरुद्ध ठेवावा, निष्पापांवर का ?” “दहशतवादाची सजा कोणत्याही भारतीयास नको”, अशा आशयाचं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं.
 
आदित्य ठाकरे म्हणाले, “ यवतमाळमध्ये काही जम्मू काश्मीरच्या विद्यार्थ्यांबाबत दुर्दैवी घटना घडली. याबाबत आम्ही कालच पत्रक प्रसिद्ध करुन आमची भूमिका स्पष्ट केली आहे. हा मुद्दा संवेदनशील आहेच, मात्र आमच्या भूमिकेकडून दुर्लक्ष करुन आमची बदनामी करण्याचा काहींचा हेतू असू शकतो.
 
मारहाण करणाऱ्यांमध्ये जे सहभागी होतं, त्यांची पक्षाने हकालपट्टी केली आहे. जम्मू आणि काश्मीर हा भारताचाच भाग आहे. त्यामुळे अशा पद्धतीने काश्मिरींनी मारुन दहशतवादविरोधी राग व्यक्त करणं चुकीचं आहे. आम्ही राग समजू शकतो, पण हा राग दहशतवादाविरोधात असावा, निष्पापांवर नको, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.