बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019 (09:49 IST)

देशात पहिली घटना वयाच्या ५२ व्या वर्षी महिलेने तीन बाळांना जन्म दिला

पुण्यातील साईश्री हॉस्पिटलमध्ये वयाच्या ५२ व्या वर्षी महिलेने तीन बाळांना जन्म दिला असून, दोन मुले आणि एक मुलगी असे अपत्य जन्मले आहेत. या पन्नाशी नंतरच्या वयात महिलेला आयव्हीएफच्या माध्यमातून तिळं जन्माला येणं भारतात प्रथमच घडले आहे. या महिला ५२ वर्षीय मूळच्या पुणे येथील आहेत. जन्म घेतला तेव्हा यातील एका बाळाची स्थिती नाजूक होती. पण, आता तिन्ही बाळांची स्थिती उत्तम आहे. डॉ. गिरीश पोटे म्हणाले की महिला ५२ वर्षांची आहे तर त्यांचं आरोग्य उत्तम होतं. त्यामुळे अशा प्रकारची आयव्हीएफच्या माध्यमातून तिळं यशस्वीरित्या जन्माला येणं सोपं झाल आहे. मुख्य म्हणजे एखाद्या ५२ वर्षीय महिलेला आयव्हीएफच्या माध्यमातून तिळं जन्माला येण्याची ही भारतातील पहिलीच घटना आहे. बाळांच्या आईच्या सांगण्यानुसार आयव्हीएफ सेंटरमधून केलेल्या पहिल्याच प्रयत्नात आम्हाला यश मिळालंय. तीन बाळांमुळे आमच्या कुटुंबात मोठा आनंदाचा क्षण आला आहे. त्यामुळे आता अनेक स्त्रिया ज्यांना माता व्हायचे आहे त्याच्या साठी एक आशेचा किरण दिसू लागला आहे.