बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019 (09:14 IST)

किसान सभेला मुख्यमंत्र्याचं लेखी आश्वासन,आंदोलकांची समजूत काढून आंदोलन स्थगित करण्याची विनंती

नाशिक ते मुंबई असा भव्य लाँग मार्च काढला आहे. याबद्दल किसान सभेच्या मागण्यांबाबत शासन स्तरावरुन गांभीर्याने विचार सुरू आहे. शेतकरी वर्गाच्या मागण्या व शासन निर्णयासंदर्भातील पत्र पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हाती आले असून, पत्र घेऊन पालकमंत्री महाजन विल्होळी येथे किसान सभेच्या शिष्टमंडळाच्या भेटीसाठी दुपारी रवाना झाले. या भेटीनंतरच आंदोलक शेतकऱ्यांची भूमिका स्पष्ट होणार आहे.
 
मुंबईच्या दिशेने निघालेल्या किसान सभेच्या लाँग मार्चचा प्रश्न तातडीने मार्गी लागावा, यासाठी शासन स्तरावर गांभीर्याने विचार सुरू आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन मुंबईत पोहोचण्यापूर्वीच मिटावे, यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वतीने पालकमंत्री महाजन गुरुवारी, २१ फेब्रुवारीला नाशिकमध्ये दाखल झाले. रात्री ९ वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ आणि पालकमंत्री यांच्यात झालेली बैठक निष्फळ ठरली होती.  वनजमिनी नावावर कराव्यात, सरकारी दाखल्यांवर नावे लावावीत, पश्चिमेकडे जाणारे पाणी पूर्वेकडे वळवावे, अशा विविध मागण्यांसाठी किसान सभेने मुंबईच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. त्यामुळे निवडणुकी आधी हा महामोर्चा थांबवावा म्हणून सरकार प्रयत्नात असून त्यामुळे निवडणुकीवर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यासाठी हा प्रश्न मुंबई आगोदरच मिटावा म्हणून प्रयत्न करण्यात येत आहेत.