बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

जनमताच्या आधारावर निवडणुका जिंकू - दिलीप वळसे पाटील

विरोधी बाजूने कितीही मोठी ताकद लावली, तरी आपण जनमताच्या आधारावर निवडणूक जिंकायचीच, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी केले. पक्षाच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात ईशान्य मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
 
वळसे पाटील पुढे म्हणाले की या सरकारच्या काळात लोकशाही मोडीत काढली जात आहे. आज देशात २०१४ सारखी परिस्थिती राहिलेली नाही. माननीय शरद पवार सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र आणत आहेत. त्यामुळे आपण या जातीयवादी शक्तींचा पराभव करू शकतो, पण त्यासाठी आपल्याला एकजुटीने काम करावे लागेल.
 
या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर achin Ahir , माजी खासदार संजय दिना पाटील, माजी आमदार अशोक धात्रक, मनपाच्या मुंबई महिला अध्यक्षा सुरेखा पेडणेकर, मुंबई युवक अध्यक्ष निलेश भोसले, सिद्धिविनायक ट्रस्टचे माजी अध्यक्ष नरेंद्र राणे आणि अन्य प्रमुख पदाधिकारीही उपस्थित होते.