गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

राष्ट्रवादी काँग्रेसकडून हिंदू महासभेचा निषेध

औरंगाबाद : हिंदू महासभेच्या पूजा पाण्डे या महिलेने महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनी राष्ट्रपिता महात्मा  गांधी यांच्या छायाचित्रावर गोळ्या झाडत अमानवी पद्धतीने हिंसक व उन्मादी पद्धतीने उत्सव साजरा केला. त्यामुळे देशभर संताप व्यक्त केला जात आहे.

राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने आज शेंद्रा येथे औरंगाबाद-जालना रस्ता रोखून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू महासभा या संस्थांच्या पुतळ्याचे प्रतिकात्मक दहन केले गेले. सुमारे पंधरा मिनिटे औरंगाबाद-जालना या महामार्गावरची वाहतूक पूर्णतः बंद होती. राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान व आमदार विद्याताई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. RSS मुर्दाबाद, आरएसएस हटाओ, देश बचाओ, हिंदू महासभा मुर्दाबाद, मोदी हटाओ, देश बचाओ या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.