testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

सासरच्या मंडळींवर विवाहितेची फिर्याद, विवाहितेला पंचांबरोबर शारीरिक संबंध ठेवण्याचेही आदेश

rape
राज्यात पुन्हा जातपंचायत आणि त्याचा अमानवी छळ समोर आला आहे. सासरच्या मंडळींवर कौटुंबिक हिंसाचार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता म्हणून जालना जिल्ह्यातील एका २८ वर्षीय पीडितेसह तिच्या कुटुंबियांना वैदू जात पंचायतीने समाजातून बहिष्कृत केले होते. हे सर्व प्रकरण इतक्यावरच थांबले नाही, पंचांबरोबर शारीरिक संबंध ठेवण्याचेही आदेश पंचायतीने दिले होते. सोबतच पीडितेच्या बहिणीचे ठरलेले लग्न तोडण्यात आल्याचा हिडीस प्रकार घडला असून सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. संबंधित सहा पंचांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जालना जिल्ह्यातील राजूर येथील पीडितेचे ६ नोव्हेंबर २००९ ला बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील ज्ञानेश्वर राजे याच्यासोबत वाजत गाजत
लग्न झाले होते. काही दिवसांतच सासरच्या मंडळींकडून मोटारसायकल घेण्यासाठी पन्नास हजारांची मागणी करण्यात येऊ लागली. ती देण्यास असमर्थता दाखविल्यानंतर पीडितेला मारहाण करण्यात आली. मुलीने माहेरी या त्रासाबाबत माहिती दिल्यानंतर कौटुंबिक हिंसाचार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर जात पंचायतीने नवर्‍याचे दुसरे लग्न लावून दिले. पंचायतीने पीडितेसह तिच्या कुटुंबियांना बहिष्कृत केले.

जातीची बदनामी केली असल्याने जातीबाहेर काढण्यात आल्याचे पंच तात्या रामा शिवरकर, अण्णा मल्लू गोडवे यांनी जाहीर केले. ही ‘मोगलाय माल’ आहे, अशा शब्दात पीडितेची बदनामी करत तिला लग्न मंडपातून बाहेर काढले. ही महिला जात पंचायतीसाठी कलंक आहे, असे सांगण्यात आले. तिच्या बहिणीचे ठरलेले लग्न पंचायतीने मोडले. या प्रकरणी पंच तात्या रामा शिवरकर, अण्णा गोडवे, मोतीराम चव्हाण, शामराव शिंदे, बाळासाहेब लोखंडे, तात्या ठिदे आणि दालीरामा लासुण यांच्याविरुद्ध सामाजिक बहिष्कार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आजही जात पंचायत फार मोठ्या प्रमाणत लोकांना त्रास देत आहे असे समोर आले आहे. त्यामुळे राज्य शासनाने लवकरच कठोर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक संस्था आणि समाजसेवक नागरिक करत आहेत.


यावर अधिक वाचा :

Maruti Suzuki ने दिवाळी अगोदर आपल्या ग्राहकांना दिली भेट, ...

Maruti Suzuki ने दिवाळी अगोदर आपल्या ग्राहकांना दिली भेट, 5000 रुपयांपर्यंत स्वस्त केल्या कारी
देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुजुकीने आपल्या ग्राहकांना दिवाळीच्या अगोदर ...

Whatsapp चे आहे हे लेटेस्ट फीचर्स, नुकतेच झाले लाँच

Whatsapp चे आहे हे लेटेस्ट फीचर्स, नुकतेच झाले लाँच
मेसेजिंग सर्विस Whatsapp ने मागच्या काही महिन्यात बरेच शानदार फीचर्स लाँच केले आहे. ...

ब्रेक्झिट: बोरिस जॉन्सन यांचा ब्रिटिश संसद स्थगितीचा निर्णय ...

ब्रेक्झिट: बोरिस जॉन्सन यांचा ब्रिटिश संसद स्थगितीचा निर्णय बेकायदेशीर - सुप्रीम कोर्ट
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ब्रिटिश संसद स्थगित करण्याचा निर्णय चुकीचा होता, ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘फादर ऑफ इंडिया’ – डोनाल्ड ट्रम्प

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘फादर ऑफ इंडिया’ – डोनाल्ड ट्रम्प
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक महान नेते आहेत. तसेच एक सभ्य आणि चांगले व्यक्ती ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ग्लोबल गोलकीपर्स’ पुरस्काराने ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ग्लोबल गोलकीपर्स’ पुरस्काराने सन्मान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बिल अँड मिलिंडा गेट्‌स फाऊंडेशन च्या प्रतिष्ठित अशा ग्लोबल ...

शिवसेनेत अंतर्गत वाद ३६ नगरसेवक, ३५० पदाधिकारी यांनी दिला ...

शिवसेनेत अंतर्गत वाद ३६ नगरसेवक, ३५० पदाधिकारी यांनी दिला राजीनामा
नाशिक येथे शिवसेनेला मोठा जबर धक्का बसला आहे. यामध्ये नाशिक विधानसभा क्षेत्रातील असलेल्या ...

विरोधक भांडत आहेत विरोधी पक्षासाठी - मुख्यमंत्री

विरोधक भांडत आहेत विरोधी पक्षासाठी - मुख्यमंत्री
भाजपाच्या हाती सत्ता येत असल्याने या निवडणुकीत चुरस उरली नाही, तर त्यामुळे काँग्रेसने हार ...

नारायण राणे अखेर भाजप मध्ये, पक्ष देखील केला विलीन

नारायण राणे अखेर भाजप मध्ये, पक्ष देखील केला विलीन
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे विलीनीकरण आणि कार्यकरत्यांचा भाजपा प्रवेश अखेर आज ...

विधानसभा निवडणूक: बाबासाहेब आंबेडकरांचं इंदू मिलमधलं स्मारक ...

विधानसभा निवडणूक: बाबासाहेब आंबेडकरांचं इंदू मिलमधलं स्मारक 2020पर्यंत पूर्ण होणार का?
"इंदू मिलच्या जागेवरचं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक 2020 पर्यंत पूर्ण केलं जाईल. ...

काश्मीर : मोबाईल सेवा सुरू, पण नागरिकांमध्ये मात्र नाराजी, ...

काश्मीर : मोबाईल सेवा सुरू, पण नागरिकांमध्ये मात्र नाराजी, कारण...
काश्मीरमध्ये तब्बल अडीच महिन्यांनंतर सोमवारी दुपारी 12 वाजता मोबाईल सेवा सुरु करण्यात ...