शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

आईची क्रूरता, 5 वर्षाच्या मुलीला दिले मेणबत्तीचे चटके

जन्मदात्या आईची क्रूरता जाणून वाचणार्‍यांचा अंगावर शहारे येतील परंतू आई कशी पाझरली नाही हे कळत नाही. नवी मुंबई येथील कळंबोलीमध्ये घरात दंगा करते म्हणून आईने आपल्या पाच वर्षाच्या मुलीला मेणबत्तीचे चटके दिले. शरीरावर जागोजागी चटक्यांचे व्रण बघून वडिलांनी थेट पोलिस ठाणे गाठले.
 
या प्रकरणात मुलीच्या वडिलांनी ठाण्यात एफआयआर दाखल केली आहे. 
 
बुधवारी कामावरून घरी आल्यावर पीडित मुलीने वेदना असह्य होऊ लागल्या म्हणून हा प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. हे ऐकताच वडिलांचा संताप झाला आणि त्यांनी मुलीची आई अनिता आणि तिचा साथ देणारी भावजय रिंकी विरुद्ध पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी दोघी महिलांना अटक केली.
 
पोलिसांप्रमाणे बुधवारी मुलगी घरात दंगा मस्ती करत होती. आईने तिला शांत बसायला सांगितले पण तिने आईकडे दुर्लक्ष करत मस्ती सुरू ठेवली त्यामुळे नाराज आईने भावजयच्या मदतीने तिला मेणबत्तीचे चटके दिले.
 
पोलिस याचा अधिक तपास करत आहे परंतू जन्मदात्री आईची क्रूरता बघून सर्व हैराण आहे.