सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018 (15:33 IST)

मिशेल ओबामाने उघडले आयुष्यातले गुपित

अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांच्या पत्नीने म्हणजेच मिशेल ओबामाने त्यांच्या आयुष्यातले एक गुपित उघड केले आहे. २० वर्षांपूर्वी जेव्हा गर्भपात झाला होता तेव्हा मी खूप निराश आणि वैफल्यग्रस्त झाले होते. त्यानंतर IVF तंत्राने माझ्या दोन मुलींचा जन्म झाला असे मिशेल ओबामा यांनी म्हटले आहे. बराक आणि मिशेल यांना दोन मुली आहेत मालिया आणि साशा अशी त्यांची नावे आहेत. या दोघींचाही जन्म IVF तंत्राने झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 
मिशेल ओबामा यांनी बिकमिंग नावाचे पुस्तक लिहिले आहे. ज्याचे प्रकाशन आज होणार आहे. ४२६ पानांच्या पुस्तकात मिशेल ओबामांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंगांचा उल्लेख केला आहे. इतकेच नाही तर व्हाईट हाऊसमधली आठ वर्षे कशी होती? अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची पत्नी म्हणून त्यांना काय वाटलं हे सगळंही या पुस्तकात त्यांनी कथन केलं आहे. बराक आणि मिशेल या दोघांची मुलगी मालिया ही २० वर्षांची आहे तर साशा १७ वर्षांची आहे.