शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018 (15:26 IST)

लक्षवेधी ठरणारी इशा अंबानी आणि आनंद पिरामलची लग्नपत्रिका

उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी इशा अंबानी आणि आनंद पिरामलची लग्नपत्रिका सर्वांसमोर आली आहे. अतिशय सुरेख, लक्षवेधी आणि तितक्याच थक्क करणाऱ्या किंमतीची ही पत्रिका सर्वांचं लक्ष वेधत आहे. यामध्ये अनेक बारकावे टीपण्यात आले आहेत.  
 
भारतीय सभ्यता आणि संस्कृतीमध्ये कुटुंबातील मोठ्या व्यक्तींना दिला जाणारा आदर लक्षात घेत आनंद आणि इशाची ही पत्रिका त्यांच्या कुटुंबातील अशाच मोठ्या व्यक्तींना समर्पित करण्यात आल्याचं वृत्तं 'वोग इंडिया'ने प्रसिद्ध केलं आहे. फ्लोरल डिझाईन असणाऱ्या या पत्रिकेत सौम्य रंगांचा वापर करत आणि 'ओम'ला केंद्रस्थानी ठेवत इशा आणि आनंदच्या नावांची आद्याक्षरं छापण्यात आली आहेत. त्याशिवाय गायत्री मंत्राचा अतिशय सुरेख असा वापरही या पत्रिकेत करण्यात आला आहे. आपल्या आजी-आजोबांविषयीच्या भावनांना इशाने व्यक्त केली आहे. तिच्याच हस्ताक्षरात पत्रिकेत हा मजकूर अतिशय सुरेखपणे छापण्यात आला आहे.