रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

संतापजनक : मुख्यध्यापकाने केला २१ मुलींचा लैंगिक छळ

मराठवाड्यातील प्रगत जिल्हा असलेल्या औरंगाबाद येथील सोयगाव तालुक्यात जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकाने २१ विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी पीडित मुलीचा जबाब घेत गटविकास अधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई सुरु केली आहे. 
 
जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेतील सोयगाव तालुक्यातील जरंडी गावात मुख्याध्यापका विरोधात २१ विद्यार्थिनींनी जबाब दिला आहे. गेल्या आठवडाभरापासून शाळेतील मुख्याध्यापक अश्लील भाषेचा वापर करुन बोलत असे, तर अनेकदा इशारा करत असे असा  गंभीर आरोप मुलींनी केला आहे. या सर्व मुली सहावी ते आठवी या तीन वर्गातील आहेत. मुलींनी हा प्रकार घरी सांगितला होता, यावर  पालकांनी लगेच  शाळा गाठली होती. यानंतर पालकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे गटशिक्षण अधिकारी विजय दुतोंडे हे देखील शाळेत गेले होते.  त्यांनी २१ विद्यार्थिनींचा जबाब घेतला. या प्रकरणी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष विष्णू वाघ यांनी सोयगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.  मुख्याध्यापक हा सर्व प्रकार पाहून  फरार झाला आहे.