बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 12 मे 2018 (09:04 IST)

औरंगाबाद पैठण रस्त्यावर अपघात, ९ ठार

औरंगाबाद पैठण रस्त्यावर पाण्याचं टँकर आणि एका अॅपे रिक्षामध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ९  जणांचा मृत्यू झाला आहे. 
 
यात सुदैवाने यात एक चिमुकली बचावली आहे. पैठण रस्त्यावरील गेवराई तांड्याजवळ हा अपघात झाला. पाण्याने भरलेला टँकर औरंगाबादच्या दिशेनं येत होता. तर रिक्षा चितेगावच्या दिशेनं येत असताना हा भीषण अपघात झाला आहे. अपघात इतका भीषण होता की यात रिक्षाचा अक्षरश: चुराडा झाला आहे. त्यामुळे मृतदेहांची ओळख पटण्यातही अडचणी येत आहेत.