बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 11 मे 2018 (11:41 IST)

मोदीजी, तुमच्याप्राणे कोणीही पंतप्रधान होऊ शकतो : संजय राऊत

या देशातील प्रत्येक नागरिकाला पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहण्याचा हक्क आहे. जर मोदी स्वतःला प्रधानसेवक म्हणत असतील तर देशातील कोणताही सेवक पंतप्रधान बनू शकतो, असे खासदार संजय राऊत म्हणाले.
 
राहुल गांधी यांनी पंतप्रधान बनण्याबाबत केलेल्या वक्तव्याची मोदी यांनी खिल्ली उडवली होती. मोदींच्या राहुल विरोधातील वक्तव्याचा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. या देशात प्रत्येक व्यक्ती पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहू शकतो. जर मोदी स्वतःला प्रधानसेवक म्हणत असतील तर कोणताही सेवक देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, असे राऊत यांनी सांगितले. आगामी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेससर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला तर तुम्ही पंतप्रधान होणार का? असा प्रश्र्न राहुल गांधींना विचारण्यात आला होता. यावर 'हो नक्कीच' असे उत्तर राहुल यंनी दिले होते. त्यांच्या या वक्तव्याचा मोदींनी प्रचारसभेत समाचार घेतला होता.