बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 10 मे 2018 (15:28 IST)

2019 मध्ये सुट्ट्यांची मज्जा कायम

पुढच्या वर्षी अर्थात  2019 मध्ये  रविवार धरुन तब्बल 73 सुट्ट्या मिळणार आहेत. तर 52 आठवड्यांचे 52 रविवार आणि सणावाराच्या 21 सु्ट्ट्या असे एकूण 73 दिवस  आराम करता येणार आहे. ज्यांना सर्व शनिवार-रविवार सुट्टी असते, त्यांना तर 120 दिवस सुट्ट्या मिळणार आहेत. फक्त तीनच सण रविवारी आल्यामुळे तीन सुट्ट्या गेल्या आहेत. 2019 सालची दिनदर्शिका तयार करण्याचं काम पूर्ण झाले असून पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी पुढील वर्षीच्या सुट्ट्यांचे दिवस सांगितले आहेत.
 
रविवारला जोडून शनिवारी आलेल्या सुट्ट्यांची संख्या पाच आहे. त्यामुळे वर्षातून पाचवेळा तुम्हाला 'दुहेरी' सु्ट्टीचा आनंद मिळेल. ज्यांचा पाच दिवसांचा आठवडा असतो, अशा 'सॅटर्डे-सन्डे' सुट्टीधारकांच्या मात्र या पाच रजा गेल्या. तर रविवारला जोडून सोमवारी चार सुट्ट्या आल्या आहेत. त्यामुळे ज्यांना सर्व शनिवार-रविवार, किंवा किमान एक आड एक शनिवार सुट्टी असते, त्यांना शनिवार ते सोमवार असा लाँग वीकेंड प्लान करण्याची संधी चारवेळा मिळणार आहे.

2019 मधील सार्वजनिक (सरकारी) सुट्ट्यांची संपूर्ण यादी

प्रजासत्ताक दिन : शनिवार, 26 जानेवारी
छत्रपती शिवाजी महाराज जयंती : मंगळवार, 19 फेब्रुवारी
महाशिवरात्री : सोमवार, 4 मार्च
धुलिवंदन : गुरुवार, 21 मार्च
गुढीपाडवा : शनिवार, 6 एप्रिल
श्रीरामनवमी : शनिवार, 13 एप्रिल
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती : रविवार, 14 एप्रिल
श्रीमहावीर जयंती : बुधवार, 17 एप्रिल
गुड फ्रायडे : शुक्रवार, 19 एप्रिल
महाराष्ट्र दिन : बुधवार, 1 मे
बुद्धपौर्णिमा : शनिवार, 18 मे
रमजान ईद : बुधवार, 5 जून
बकरी ईद : सोमवार, 12 ऑगस्ट
स्वातंत्र्य दिन : गुरुवार, 15 ऑगस्ट
पतेती : शनिवार, 17 ऑगस्ट
श्रीगणेश चतुर्थी : सोमवार, 2 सप्टेंबर
मोहरम : मंगळवार, 10 सप्टेंबर
महात्मा गांधी जयंती : बुधवार, 2 ऑक्टोबर
विजयादशमी (दसरा) : मंगळवार, 8 ऑक्टोबर
दिवाळी लक्ष्मीपूजन : रविवार, 27 ऑक्टोबर
दिवाळी बलिप्रतिपदा : सोमवार, 28 ऑक्टोबर
ईद-ए-मिलाद : रविवार, 10 नोव्हेंबर
गुरु नानक जयंती : मंगळवार, 12 नोव्हेंबर
नाताळ : बुधवार, 25 डिसेंबर