रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 12 मे 2018 (15:10 IST)

दोन ठार, औरंगाबादेत नेट बंद, अफवा पासरवाल तर तुमची खैर नाही

किरकोळ करणातून झालेल्या दंगलीचे औरगाबाद येथे मोठे पडसाद उमटले आहे. दोन गटाच्या भांडणातून उसळलेला हिंसाचार नियंत्रणात आला आहे. या हिंसाचारात  40 जण जखमी झाले असून, दोघांचा मृत्यू झाला आहे. काल  रात्री साडे अकरा वाजता उसळलेल्या हिंसाचारावर पोलिसांनी  नियंत्रण मिळवल आहे. मात्र हिंसाचार ग्रस्त भागात शंभर ते दीडशे गाड्या आणि चारशे ते साडे चारशे दुकानांना आगी लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे वातावरण अजूनही तापले आहे.  दोन गटात झालेल्या दगडफेकीत 35 ते 40 जण जखमी झाले आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून काही भागात संचारबंदी आहे. आणि पूर्ण औरंगाबादमधलं इंटरनेट बंद करण्यात आले आहे. मात्र जर का अफवा पसरवली तर मग पोलिस कठोर कारवाई  करतील असा इशारा दिला आहे.  आय घटनेत जखमींमध्ये एका एसीपीचा समावेश आहे. हिंसाचार ग्रस्त भागात एसआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी कोणत्या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि पोलिसांना सहकार्य करा, असं नम्र आवाहन वेब दुनिया करत आहे. कारण आता हिंसाचार थांबला असून, पोलिस कारवाई करत आहे.मोतीकारंजा परिसरातील अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्यावरून झालेल्या वादातून दोन गट शुक्रवारी रात्री राडा झाला होता. काही लोकांच्या चुकीमुळे पूर्ण शहर वेठीस धरले गेले आहे.