मंगळवार, 19 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 12 मे 2018 (14:57 IST)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदाचा निर्णय लवकरच जाहीर - दिलीप वळसे

rashatrawadi congress

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई अध्यक्षपदाबाबत निर्णय घेण्यापूर्वी पक्षांतर्गत लोकशाही पद्धतीचा अवलंब करत निवडणूक निर्णय अधिकारीदिलीप वळसे पाटील यांनी आज दिवसभर मुंबईतील सर्व सहा विभागातील पदाधिकाऱ्यांशी टप्प्याटप्प्याने संवाद साधत आहेत. मुंबई शहर विभागातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतल्यानंतर मुंबईच्या अध्यक्षपदाबाबत नावाची शिफारस आदरणीय शरद पवार  साहेब आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे केली जाईल. त्यानंतर अधिकृतपणे घोषणा करण्यात येईल, अशी माहिती वळसे-पाटील यांनी दिली आहे. सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, मुंबई विभागीय सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अशोक धात्रक हेही या बैठकीस उपस्थित आहेत.