मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 11 सप्टेंबर 2018 (15:32 IST)

सर्वात मोठ्या जायकवाडी धरणात बॉम्ब, हे आहे सत्य

औरंगाबाद आणि मराठवाड्याला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्वात मोठ्या जायकवाडी धरणात बॉम्ब असल्याचा समोर आले आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. मात्र या मागचे सत्य बाहेर येताच सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. यामध्ये धरणावर बॉम्ब असल्याची ती अखेर अफवाच ठरली आहे. उलट सुरक्षेच्या दृष्टीने  पैठण पोलिसांच्या सरावाचा हा भाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा प्रकारचे सराव दर 15 दिवसांनी या भागात घेतले जातात, मात्र पथकाला याबद्दलची कोणतीही माहिती दिली जात नाही. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण असते, मात्र पाहणी पूर्ण झाल्यावर सराव असल्याचे जाहीर करण्यात येते आहे.
 
मराठवाड्याला पाणी पुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणाच्या मुख्य सुरक्षा भिंतीजवळ बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवल्याचे समोर आले होते. ही सर्वात मोठी बातमी वेगानं पसरली होती. त्याचे व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. मात्र हा सरावाचा भाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस निरीक्षक चंदन इमले यांच्या देखरेखीत हा सराव करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व तर्क वितर्क आता मागे पडले असून, कोणतीही अफवा पसरवू नका असे पोलिसांनी आवाहन केले आहे.