सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 13 फेब्रुवारी 2019 (17:23 IST)

पुण्यात राष्ट्रवादीचे पकोडे आंदोलन रोजगार देण्याच्या फेकूगिरीचा अनोखा निषेध

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात नोटबंदीमुळे होते त्यांचे रोजगार गेले आणि तरुणांना रोजगार मिळालाच नाही. याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे राज्यभर आंदोलन सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात रस्त्यावर भजी तळत अनोखे आंदोलन केले.
 
लाखो तरुणांना नोकरी देण्याचे आश्वासन खोटे ठरल्याचा आरोप करत ''जवाब दो, जॉब दो'' अशी घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. लाल महालापासून निघून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणाऱ्या या मोर्चात शेकडो तरूण सहभागी झाले.