रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

गदिमा यांचे सुपूत्र आणि गदिमा साहित्य कला अकादमीचे विश्वस्त श्रीधर माडगूळकर यांचे निधन

गदिमा यांचे सुपूत्र आणि गदिमा साहित्य कला अकादमीचे विश्वस्त श्रीधर माडगूळकर यांचे पुण्यातील खासगी रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांचे वय  ७२ वर्षचे होते. मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.  खासगी रुग्णालयात त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी दुपारी १ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली आहे. 

श्रीधर माडगूळकर यांचा जन्म ६ फेब्रुवारी १९४७ रोजी जन्म झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मॉडर्न हायस्कूल येथे झाले तर पुणे येथे  महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालय येथे झाले होते. श्रीधर माडगूळकर यांनी १९७० साली ‘जिप्सी’ या खास तरुणांसाठी असलेल्या मासिकाचे संपादन केले आहे. ‘धरती’ व साप्ताहिक ‘मायभूमी’ या नियतकालिकांचा उपसंपादक म्हणून काम पाहिले आहे. 

कथा महाराष्ट्रातील अनेक नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाल्या असून, श्रीधर माडगूळकर यांची ‘आठी आठी चौसष्ट’ ही कादंबरी राजकीय क्षेत्रात मैलाचा दगड आहे.  गदिमांच्या आठवणींवरील ‘मंतरलेल्या आठवणी’ हे पुस्तक फार प्रसिद्ध आहे. गोवा येथे भरलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या आठव्या शेकोटी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.