मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: लातूर: , शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019 (09:16 IST)

ड्युटीसाठी रवाना होणार्‍या लष्करी जवानांना मोफत प्रवासाची सोय

पुलवामातील लष्करी जवानांवरील भ्याड हल्ल्याचा निषेध देशभर करण्यात येत आहे. यात प्राणाची आहुती देणार्‍या ४० जवानांच्या कुटुंबियांसाठी सजग नागरिक काही ना काही करीत आहेत. लातुरच्या ट्रॅव्हल चालक संघटनेनं ड्युटीसाठी रवाना होणार्‍या लष्करी जवानांना मोफत प्रवासाची सोय केली आहे. लातुरच्या ट्रॅव्हल चालक संघटनेची बैठक घेतली यासाठी राधिका ट्रॅव्हलचे बबलू तोष्णीवाल यांनी पुढाकार घेतला. लातूर जिल्ह्यातून नगर, नाशिक, पुणे आणि मुंबईला हे जवान सुटी संपवून जाण्यासाठी निघतात. त्यांचा प्रवास सुकर व्हावा, मोफत प्रवासाच्या माध्यमातून त्यांची सेवा घडावी यासाठी हा निर्णय घेतल्याचे या व्यावसायिकांनी सांगितले. यावेळी सचिन बाहेती, जगदीश स्वामी, सोमनाथ मेरगे, काशिनाथ बळवंते, महेश पारडे, वाजीद शेख, रवी अंबुजा, भरत कुलकर्णी, शिवाजी देशमुख, अजय पांचाळ, दिनेश पौळ, दिलीप कांबळे, बापू कदम, व्यंकट माने उपस्थित होते.