मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: वॉशिंग्टन , गुरूवार, 9 मे 2019 (15:49 IST)

'एच-1बी'चे शुल्क आणखी वाढणार

अमेरिकेतील 'शिकाऊ उमेदवार' कार्यक्रमाची व्याप्ती वाढविण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी अमेरिकेने एच-1बी व्हिसाचे शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. 
 
अमेरिकेचे कामगारमंत्री अलेक्झांडर अ‍ॅकोस्टा यांनी या संदर्भातील माहिती दिली. यामुळे भारतातील आयटी कंपन्यांवरील बोजा वाढणार आहे. कागार मंत्रालयाचा वार्षिक अर्थसंकल्प सादर करण्याची तयारी सध्यासुरू आहे. या अनुषंगाने अमेरिकी काँग्रेसच्या सदस्यांसमोर अ‍ॅकोस्टा यांनी ही माहिती दिली. एक ऑक्टोबरपासून अमेरिकेच्या नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात होणार आहे.